खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!

खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!

पातूर :

तालुक्यातील सुकळी येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार

दिल्याने तलाठी व शेतकऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याची घटना ३ जून रोजी घडली असून,

Related News

गोंधळ उडाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. २७ मे रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या

कांदा भुईमूंग लिंबू तीळ ज्वारी आदी पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पातुरचे तहसीलदार राहुल

वानखेडे यांनी तलाठी व कृषी सहायकांना दिले होते.परंतु तलाठी यांनी पिकांचा नुकसान निरंक असल्याचा अहवाल सादर केला होता.

शेतकऱ्यांच्या विनंतीवरून तहसीलदारांनी पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश दिले .

३ जून रोजी तलाठी व कृषी सहाय्यक यांचा पथक गावात पोहोचला आणि तलाठी यांनी वडाखाली बसून कागद

लिहिले व शेतकऱ्यांना कोऱ्या रजिस्टरवर व पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यास सांगिले ,परंतु शेतकऱ्यांनी शेतात चला

स्थळ पंचनामे करा अशी विनंती केल्याने महिला तलाठी चिडल्या व पोलिसांना बोलावून खोटा आरोप करत

स्थळ पंचनामे करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ३ जून रोजी पातूरचे तहसीलदार व ४ जून

रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन मुजोर महिला तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

वडाखाली बसून तलाठी कोऱ्या कागदावर व पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या मागत होत्या ,

आम्ही शेतातील स्थळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली असता,

महिला तलाठी चिडल्य आणि पोलिसांना बोलावून आमच्यावर खोटे आरोप करत स्थळ पंचनामे करण्यास नकार दिला,

त्यामुळे मुजोर महिला तलाठ्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार व जल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

अशोक सीताराम घोगरे शेतकरी सुकळी

स्थळ पंचनामा करण्यावरून गोंधळ : व्हिडिओ व्हायरल

महिला तलाठी यांनी स्थळ पंचनामे करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले,

आणि स्थळ पंचनामे करण्याच्या कारणावरून गोंधळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कृषी सहाय्यकाने दिली तलाठ्यांची तक्रार!

महिला तलाठी यांची शेतकऱ्यांसोबत अरेरावी करून उद्धट वागणूक करून पीक नुकसानीचे स्थळ पंचनामे करण्यास नकार

देऊन शेतकऱ्याविरुद्ध पोलिसात खोटा आरोप घेऊन पंचनामे रखडल्याने शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू शकतात,

अशी तक्रार कृषी सहाय्यकाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukat-ekach-divashi-both-youths-suicide/

Related News