खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..

खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी – डॉ. पंजाबराव देशमुख यांना 'भारतरत्न' द्या!

नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत

माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’

पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. तसेच अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला

Related News

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची विनंती सरकारकडे केली.

भारतीय कृषी क्षेत्रात ऐतिहासिक योगदान

खासदार वानखडे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी हरित क्रांतीला प्रेरणा दिली,

सहकारी बँकिंग प्रणाली मजबूत केली आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.

त्यांच्या कार्यामुळे भारताच्या कृषी धोरणाला नवे वळण मिळाले.

तसेच, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अस्पृश्यता निवारणासाठी मोठे योगदान दिले.

बेलोरा विमानतळाला ‘डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ’ नाव द्या

खासदार वानखडे यांनी संसदेत बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव

देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की,

त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे.

सरकारने तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

Related News