खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी

खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात

खामगाव |

15 एप्रिल: खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ आज सकाळी

साडे सात वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे.

Related News

मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस आणि विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर

धडक झाल्याने या अपघातात ३ मजुरांचा मृत्यू, तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त बस अमरावतीहून बऱ्हाणपूरकडे जात होती. स्थानिकांच्या माहितीनुसार,

विटांचा ट्रक रॉंग साइडने येत असताना आमसरी फाट्याजवळ ही भीषण धडक झाली.

ट्रकमधील ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींपैकी ४ जणांची प्रकृती

चिंताजनक असून त्यांना तातडीने अकोला येथे हलवण्यात आले आहे.

एसटी बसमधील उर्वरित १६ प्रवासी जखमी असून त्यांना पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने

रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की आठवड्याभरापूर्वीच शेगाव-खामगाव रोडवर असाच एक भीषण अपघात घडला होता.

त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांनी ट्रकचालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-public-bhim-jayanti-samititarf-rolich-grand-events/

 

Related News