एका महिन्यात काटेपूर्णा प्रकल्पातून २२.४९ द.ल.घ.मी. पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबर

या एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे

लागले. या सोडलेल्या पाण्यातून शहराची वर्षभर तहान भागली

Related News

असती. ८६.३५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेला हा

काटेपूर्णा प्रकल्प शहरच नव्हे तर जिल्ह्यासाठी वरदान ठरला.

जिल्ह्यातील अनेक शहराची तहान भागवून हजारो हेक्टर जमीन

सिंचनाखाली आणतो. त्यामुळेच पावसाळा सुरु झाला की

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे काटेपूर्णा प्रकल्पाच्या

जलसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. मागील वर्षी तुलनेने कमी

पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाने १०० टक्के पातळी गाठली

नव्हती. त्यामुळे सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात

करावी लागली होती; मात्र यावर्षी जून महिना कोरडा गेला तरी

जुलै मध्यानंतर तसेच ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये कधी जोरदार तर

कधी संततधार पाऊस झाल्याने प्रकल्पाने १०० टक्के पातळी

गाठली. प्रकल्पाचे जुलै अखेरीस दरवाजे उघडावे लागले. तर

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वारंवार दरवाजे उघडावे लागले.

तूर्तास प्रकल्प १०० टक्के भरल्याने आता पुढे पाऊस झाल्यास

पुन्हा दरवाजे उघडावे लागणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तीस

दिवसात प्रकल्पातून २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात

आले.

या योजनांना पाणी पुरवठा

– अकोला शहर पाणी पुरवठा योजना

– मूर्तिजापूर शहर पाणी पुरवठा योजना

– ६० खेडी पाणी पुरवठा योजना

– ४ खेडी पाणी पुरवठा योजना

– औद्योगिक वसाहत मत्सबीज उत्पादन

Read also: https://ajinkyabharat.com/pok-join-india-why/

Related News