कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो….

कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो....

नवी दिल्ली | प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तिन्ही सैन्यदलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले असून,

Related News

पाकिस्तानकडून अधिक हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे.

या दरम्यान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी धक्कादायक दावा केला आहे.

ते म्हणाले, “पुढील सात दिवसांत भारत पाकिस्तानविरोधात मोठी लष्करी कारवाई करू शकतो.

हल्ल्यानंतरचा धोका वाढला

22 एप्रिल रोजी बैसरन व्हॅली, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला.

सूत्रांनुसार, हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानमध्ये परतले आहेत. यामुळे भारताची कारवाईची शक्यता आणखी बळावली आहे.

उरी आणि पुलवामाच्या धर्तीवर कारवाई होणार?

अब्दुल बासित यांनी 2016 च्या उरी हल्ल्यानंतर आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक

आणि एअर स्ट्राईक ची आठवण करून दिली. “भारत आता पुन्हा तसंच काही करेल,” असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकत्याच दिलेल्या भाषणात पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

त्यामुळे लष्करी कारवाईचा काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे.

सिंधू जल कराराचाही उल्लेख

बासित यांनी सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्यासंदर्भातही चिंता व्यक्त केली.

त्यांनी पाकिस्तान सरकारला जागतिक बँकेशी संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. “भारत आपले आंतरराष्ट्रीय कर्तव्य पाळत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.

Read Also : https://ajinkyabharat.com/torrent/

Related News