करतवाडी (आ ) येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळेची दयनीय अवस्था

करतवाडी (आ ) येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळेची दयनीय अवस्था

नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेची उदासीनता

विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी

अकोट : तालुक्यातील अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, शिक्षण विभागातील करतवाडी (आ )

Related News

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची दयनीय अवस्था असल्याचे दिसून आले आहे.

सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत आहेत.

अनेक शाळांनी नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.

अनेक उपक्रमांनी शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक शाळा सरसावल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या स्वागताचा उत्साह अनेक शाळांनी दाखविला आहे.

मात्र अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळा विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाच्या स्वागतासाठी उदासीन असताना दिसत आहेत.

अकोट तालुक्यातील करतवाडी (आ ) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची अत्यंत बिकट परिस्थिती निदर्शनास आली आहे.

22 जुलै रोजी दैनिक अजिंक्य भारतचे अकोट प्रतिनिधी विशाल आग्रे यांनी थेट शाळेतील दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

सोमवार 23 जुलै रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळा सुरू होत असताना नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी अनेक शाळांनी केली आहे.

मात्र करतवाडी (आ )येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय व बिकट असल्याचे आढळून आले आहे.

शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये जनावरांचा वावर, शाळेचा परिसर सर्वत्र अस्वच्छ, मातीचे रेतीचे मोठे ढिगारे,

शाळेतील परिसरात गवत वाढलेले, गेट तुटलेले, वर्ग खोल्यांना खिडक्या व दरवाजे सुद्धा नाहीत.

आवार भिंत पडलेल्या, विद्यार्थ्यांच्या शौचालयाची बिकट परिस्थिती, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा उपलब्ध नाही.

शाळेच्या नवीन सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापक व शिक्षक

यांनी कुठलीच स्वच्छता व तयारी केलेली आढळून आली नाही.

विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी येताच त्यांना अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य असताना दिसून येणार आहे.

सर्वत्र शाळा घाणीच्या साम्राज्यात अडकलेली, या सर्व प्रकाराला जबाबदार कोण?

यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक व कार्यरत शिक्षक यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संपूर्ण गंभीर प्रकाराकडे अकोट पंचायत समितीचा शिक्षण विभाग गाड झोपेत असताना दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने या सर्व गंभीर प्रकाराकडे व संबंधितांकडे गांभीर्याने लक्ष देऊन माननीय जिल्हाधिकारी

अकोला तसेच माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक),जिल्हा परिषद अकोला यांनी विशेष लक्ष देऊन,करतवाडी (आ) जिल्हा

परिषद प्राथमिक मराठी शाळेची गंभीर समस्या सोडवावी व शाळेतील संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर उचित व कायदेशीर

कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने जोर धरू लागली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/dhanakwadi-zaphet-vidyarthayancha-praveshotsav-soh/

Related News