मुंबई | सोशल मीडियावर आपल्या अतरंगी फॅशनसाठी सतत चर्चेत असलेली अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर
उर्फी जावेद यंदा कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होती.
मात्र तिचा व्हिसा नाकारल्यामुळे ती हा ऐतिहासिक क्षण गाठू शकली नाही.
Related News
ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;
बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी
शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;
“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करावं की विकावं
अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,
शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी परदेश यात्रा रद्द;
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवरून गायब असलेल्या उर्फीने अखेर परत येत एक भावनिक पोस्ट लिहून आपली व्यथा मांडली आहे.
उर्फीने लिहिलं –
“मी कुठेच दिसत नव्हते, काहीच पोस्ट करत नव्हते कारण मी आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात होते.
माझा बिझनेस चालला नाही, मी इतर गोष्टीही ट्राय केल्या पण सर्वत्र केवळ रिजेक्शनच मिळालं.
‘इंडे वाइल्ड’च्या माध्यमातून मला कान्सला जाण्याची संधी मिळाली होती (दीपा खोसला आणि क्षितिज
कंकरिया यांचे मनापासून आभार), पण दुर्दैवाने माझा व्हिसा रिजेक्ट झाला.”
फॅशनची तयारी, पण फटकलाच बसला…
उर्फी पुढे म्हणाली की, “मी वेड्यासारख्या आउटफिट्सवर काम करत होते. माझी टीम आणि माझं हृदय अक्षरश: तुटून गेलं.”
तिनं या पोस्टमध्ये चाहत्यांना आपली कहाणी शेअर करायला सांगितलं आणि लिहिलं –
“तुमच्यापैकी अनेकांना रिजेक्शनचा सामना करावा लागत असेल, मला तुमचंही ऐकायला आवडेल.”
“रडणं सामान्य आहे – ते हेल्दी आहे”
उर्फीने आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिलं – “रिजेक्शन आलं की रडणं नैसर्गिक आहे, ते आरोग्यदायी आहे.
प्रत्येक नकारात एक संधी असते. मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका.”
काय आहे ‘इंडे वाइल्ड’?
Indē Wild हे एक हेल्थ अॅण्ड ब्यूटी ब्रँड असून, त्यांनी यंदाच्या कान्स फेस्टिवलमध्ये भारतातील काही डिजिटल
क्रिएटर्सना प्रतिनिधित्वासाठी बोलावलं होतं. उर्फी यापैकी एक होती, पण तिचा प्रवास वीजाच्या अडथळ्यामुळे अधुरा राहिला.
Read Also : https://ajinkyabharat.com/shopianmadhye-operation-keller/