ड्रोन सर्व्हे व शोधमोहीम राबवली, सेंसर कॅमेऱ्यांची बसवण
कळंबा खुर्द शिवारात बिबट्या किंवा वाघ शिरल्याची चर्चा रंगली होती.
यानंतर वन विभाग तात्काळ हालचालीला लागला.
आज (27 ऑगस्ट ) रोजी वन विभाग अधिकारी गजानन गायकवाड सर
यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कळंबा खुर्द शिवारात दाखल होत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी केली.
यावेळी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोधमोहीम राबवली.
मात्र पाहणीत बिबट्या अथवा वाघाचा कोणताही ठसा लागला नाही.
सावधगिरीचा उपाय म्हणून गावातील
रवी सदाशिव ठाकरे यांच्या शेतात सेंसर कॅमेरा बसवण्यात आला
असून येत्या काही दिवसांत तो परिसर सातत्याने तपासला जाणार आहे.
या मोहिमेत वनरक्षक अधिकारी नितीन सावळे, तुषार अवारे, इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानित बाळ काळणे सर
यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यामध्ये पोलीस पाटील सुधाकर ठाकरे, चंद्रमनी सावळे,
माजी सरपंच अंकुश ठाकरे, माजी उपसरपंच राहुल सावळे,
तंटामुक्ती अध्यक्ष कळू सावळे, माजी अध्यक्ष जुगल सावळे,
तसेच राजू बक्षी तायडे, शिवाजी ठाकरे, गौरव ठाकरे, निलेश ठाकरे,
आनंदा ठाकरे, सौरभ वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/foster-minister-sanjay-rathod-yanchaya-niwasthi-shri-ganesha-establishment/