मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोघांमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरुन वाद झालेला पाहायला मिळतो आहे, या व्हिडिओत दिग्दर्शक-अभिनेते सौरभ शुक्लाही दिसत आहेत. वाचा या अभिनेत्यांमध्ये कशावरुन वाद झाला आहे.
कशावरुन झाला आहे वाद?
तर अक्षय आणि अर्शद या दोन्ही कलाकारांनी त्यांचा आगामी सिनेमा ‘जॉली एल. एल. बी ३’च्या शूटिंगला सुरुवात केली असून खरा जॉली कोण यावरुन त्यांचा वाद झाला आहे. ‘जॉली एल. एल. बी’ आणि ‘जॉली एल. एल.बी. २’ या सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पहिल्या सिनेमात अभिनेता अर्शद वारसी जगदीश त्यागी उर्फ जॉली या भूमिकेत होता, तर दुसऱ्या सिनेमात अक्षय कुमार जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली या भूमिकेत होता. आता खरा कोण आणि बनावट कोण, असा सवाल करणारा हा प्रमोशनल व्हिडिओ आहे.
जेव्हापासून जॉली LLB ३साठी अक्षय आणि अर्शद एकत्र काम करणार आहेत, हे समोर आले आहे तेव्हापासून प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आता त्यांनी खरा जॉली कोण आणि खोटो कोण, असा सवाल करत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणून धरली आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत दोघेही वकिलाच्या भूमिकेत दिसत आहेत, दोघेही स्वत:ला खला जॉली तर दुसरा बनावट असल्याचे ठामपणे सांगत आहेत.
Related News
Bigg Boss 6 Bhaucha Dhakka : सोनावणे वहिनी आणि कारंडे वहिनींच्या विनोदाने घरात हसवा-खळखळा
Bigg Boss मराठीच्या सिझन 6 मध्ये घरातील...
Continue reading
रेकॉर्डब्रेकिंग वेब सीरीज ‘Wednesday’: चार वर्षांनंतरही ओटीटीवर नंबर 1
रेकॉर्डब्रेकिंग वेब सीरीज ‘Wednesday’: ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सचा वाप...
Continue reading
Akshay कुमार–प्रियदर्शन यांची हॉरर-कॉमेडी ‘भूत बंगला’ 15 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये एंट्री
मुंबई : बॉलिवूडमध्ये Akshay कुमार हे एक असे नाव आहे ज्याने दश...
Continue reading
Farah खान आणि दिलीपचा धमाका: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले
Farah खान आणि तिचा स्वयंपाकी दिलीप या जोडीने गेल्या काही दिवसांपासून इंटरने...
Continue reading
अमिताभ-जया Bachchan: घरातील गंभीरतेपासून मंचावरच्या धमाक्यापर्यंत Augustya Nanda ने उघडले घरगुती रहस्य
बॉलिवूडमध्ये अमिताभ Bachchan आणि जया Bachchan...
Continue reading
Sonakshi सिन्हा : शत्रुघ्न सिन्हांच्या जुळ्या मुलांबाबत मोठा खुलासा. सोनाक्षी सिन्हा आणि तिचे चित्रपट क्षेत्रातील सफर
Continue reading
Ranbir कपूरबद्दल पियूष मिश्रचं मोठं विधान: “इतका नग्न आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही”
अभिनेता Ranbir कपूर ही इंडस्ट्रीतील एक अशी ओळख आहे जिने ...
Continue reading
अनुष्का सरकटे-इंद्रनील कामतची जोडी घेऊन येत आहे स्टार प्रवाहवर नवी धडाकेबाज मालिका ‘वचन दिले तू मला’
स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी येत्या १५ डि...
Continue reading
स्मृती मंधानाच्या हळदीसोहळ्यात टीम इंडियाच्या सहकाऱ्यांची धमाल, पाहा रंगतदार क्षणांचे व्हिडीओ
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना आप...
Continue reading
R Madhavan lookalike spotted in Kalyan Fast Train goes viral! Watch how this viral moment created a frenzy among Mumbai local passengers and social ...
Continue reading
OTT Release : प्रत्येक आठवड्यात नवनवीन कंटेन्ट प्रदर्शित होत असतो. प्रेक्षक देखील या नव्या वेब सीरिज, सिनेमे घरबसल्या पाहण्यासाठी उत्सुक असतात. या ...
Continue reading
“मोठी माणसं अफेअर लपवण्यात तरबेज असतात” — Twinkle Khannaचं बिनधास्त वक्तव्य पुन्हा चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री, लेखिका आणि आता टॉक शो होस्ट म्हणून प्रसिद्ध झालेली
Continue reading
अक्षयने व्हिडिओ शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, ‘आता ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण हे तर माहीत नाही, पण हा प्रवास खूप जॉली असणार आहे हे मात्र नक्की. आमच्यासोबत राहा, जय महाकाल!’ व्हिडिओमध्ये अर्शद असे म्हणतो की, ‘जगदीश त्यागी, बीए एल. एल.बी…. डुप्लिकेटपासून सावधान’. तर अक्षय म्हणतो की, ‘जगदीश्वर मिश्रा, बीए एल. एल. बी…. ओरिजनल जॉली, लखनऊ वाले’. तर शेवटी सौरभ शुक्ला यांच्या हातात एक पाटी दाखवण्यात आली आणि त्यावर असे लिहिले आहे की, ‘जॉली एल. एल. बी. ३ च्या शूटिंगला सुरुवात’.
‘जॉली एल. एल. बी’ सिनेमाचे पहिले दोन भाग दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केले होते, तेच तिसऱ्या भागाचेही दिग्दर्शन करणार आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.