सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालठाणा
येथील विद्यार्थिनी कु. रक्षा राजेंद्र सोळंके हिने जवाहर नवोदय विद्यालय,
अकोला प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
या आधीही या शाळेतील विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले असून, ही उज्ज्वल परंपरा रक्षा हिने पुढे चालू ठेवली आहे.
या यशामध्ये शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अरुण निमकर्डे सर व वर्गशिक्षक अमोल ढोकणे
सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांसाठी विशेष नवोदय वर्ग,
गणितीय शॉर्ट कट्स शिकवणे, प्रश्नसंच सोडवून घेणे,
तसेच शाळा सुटल्यानंतरही विशेष मार्गदर्शनाचे उपक्रम राबवले गेले.
रक्षाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील (राजेंद्र सोळंके व भाविका सोळंके), मुख्याध्यापक,
शिक्षक व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांना दिले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती तेल्हारा गटशिक्षणाधिकारी दिनेशजी दुतंडे,
बेलखेड केंद्रप्रमुख यासीन सर, शाळा व्यवस्थापन समिती व मुख्य कार्यकारी
अधिकारी बी. वैष्णवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिरांचा मोठा फायदा झाल्याचेही सांगण्यात आले.
गावात व शाळेत या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून,
रक्षाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.