कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन वेळेत
अनेक विभागांतील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कक्षात गैरहजर असल्याचे सोमवारी (ता. ७) पाहायला मिळाले.
या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे.
ग्रामविकासाच्या योजनांवर परिणाम
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचलाऊ व निष्काळजी भूमिकेमुळे
अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी अडथळ्यांमध्ये सापडली आहे.
सीईओ बदलीनंतर पुन्हा शिथिलता
माजी सीईओ बी. वैष्णवी यांनी अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
मात्र त्यांची अलीकडेच नागपूर महापालिकेत बदली झाल्यापासून, अनेक ‘दांडीबहाद्दर’ कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.
‘टपरी’चे कर्मचारी!
काही कर्मचारी बायोमेट्रिक हजेरीनंतर कार्यालयात थांबतच नाहीत,
तर जिल्हा परिषद आवारात भटकंती करताना, चहा टपरी, पानपट्टीवर थांबलेले दिसतात.
त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.
साहेब गेलेत, थोड्याच वेळात येतील…
गैरहजर कर्मचाऱ्यांविषयी विचारल्यावर “साहेब आत्ताच बाहेर गेलेत”, “जिल्हाधिकारी कार्यालयात काम आहे”,
अशा बनवाबनवी कारणांची सरबत्ती केली जाते. त्यांचे सहकारीदेखील बेशिस्त वागणुकीवर पांघरूण घालतात.
विजेचा देखील अपव्यय
कार्यालय रिकामे असताना लाईट्स व पंखे सुरू ठेवून विजेचा अपव्यय होत असल्याचेही पाहायला मिळाले.
याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
नागरिकांमध्ये संताप
सरकारी कार्यालयात वेळेवर काम न झाल्याने सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून,
अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्हा परिषद प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.