कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन वेळेत
अनेक विभागांतील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कक्षात गैरहजर असल्याचे सोमवारी (ता. ७) पाहायला मिळाले.
या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे.
ग्रामविकासाच्या योजनांवर परिणाम
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचलाऊ व निष्काळजी भूमिकेमुळे
अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी अडथळ्यांमध्ये सापडली आहे.
सीईओ बदलीनंतर पुन्हा शिथिलता
माजी सीईओ बी. वैष्णवी यांनी अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
मात्र त्यांची अलीकडेच नागपूर महापालिकेत बदली झाल्यापासून, अनेक ‘दांडीबहाद्दर’ कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.
‘टपरी’चे कर्मचारी!
काही कर्मचारी बायोमेट्रिक हजेरीनंतर कार्यालयात थांबतच नाहीत,
तर जिल्हा परिषद आवारात भटकंती करताना, चहा टपरी, पानपट्टीवर थांबलेले दिसतात.
त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.
साहेब गेलेत, थोड्याच वेळात येतील…
गैरहजर कर्मचाऱ्यांविषयी विचारल्यावर “साहेब आत्ताच बाहेर गेलेत”, “जिल्हाधिकारी कार्यालयात काम आहे”,
अशा बनवाबनवी कारणांची सरबत्ती केली जाते. त्यांचे सहकारीदेखील बेशिस्त वागणुकीवर पांघरूण घालतात.
विजेचा देखील अपव्यय
कार्यालय रिकामे असताना लाईट्स व पंखे सुरू ठेवून विजेचा अपव्यय होत असल्याचेही पाहायला मिळाले.
याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
नागरिकांमध्ये संताप
सरकारी कार्यालयात वेळेवर काम न झाल्याने सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून,
अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्हा परिषद प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.