माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल
झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई
गँगने ही हत्या केल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणातील काही आरोपींची
धरपकड केली आहे. त्यात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे
जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा
आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल
झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे.
थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान
सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. तर त्याचवेळी कुडाळ
विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर
दाखल झाले आहेत. आताच्या वृत्तानुसार, अजितदादा पवार, प्रफुल्ल
पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या
सर्वच प्रकरणासह वेगवान राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.
झिशान सिद्दीकी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीत, बाबा
सिद्दीकी यांच्या हत्येसंबंधीच्या तपासाची इत्यंभूत माहिती देण्यात
आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची धागेदोर कुठंपर्यंत आहेत,
याविषयी उहापोह झाल्याचे समजते. दरम्यान झिशान यांनी याप्रकरणात
न्याय देण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानचे
जवळचे मित्र असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई
गँगशी संबंधित काही जणांनी समाज माध्यमांवर केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pavarans-trasala-koodhun-bjp-sodatoy-maji-ministers-announcement/