झाडाच्या आड लपून वाहनांवर कारवाई? – वंचित बहुजन आघाडीचा निषेध, आंदोलनाचा इशारा

झाडाच्या आड लपून वाहनांवर कारवाई? – वंचित बहुजन आघाडीचा निषेध, आंदोलनाचा इशारा

अकोला: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांकडून झाडाच्या आड

लपून वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा

आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

Related News

याविरोधात त्यांनी जिल्हाधिकारी अकोला मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

यांना निवेदन सादर केले असून, अशा प्रकारच्या कारवाया थांबवण्याची मागणी केली आहे.

गाड्या अत्याधुनिक, पण वेगमर्यादा जुन्याच?

वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या काळात रस्ते आणि वाहने

अत्याधुनिक झाले असून, गाड्या वेगाने धावतात. मात्र, दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा

किंचित जरी वेग वाढला तरीही कारवाई केली जात आहे, हे अन्यायकारक आहे.

सरकारला इशारा – कारवाई थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन

या संदर्भात जर लवकरात लवकर कारवाईचा हा प्रकार थांबवला गेला नाही,

तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Related News