जे.सी. हायस्कूलच्या अजिंक्य गाडगेने दाखवली आदर्श सामाजिक जाणीव – तान्हा पोळ्यात गोळा केलेले ११,७३० रुपये ‘एक उब जाणीवेची’ संस्थेला दान

सामाजिक

अकोला (कारंजा) – तान्हा पोळ्याच्या दिवशी खाऊसाठी जमवलेली रक्कम समाजसेवेवर

खर्च करणारा अजिंक्य गाडगे हा सहावीच्या इयत्तेतील विद्यार्थी अद्वितीय उदाहरण ठरला आहे.

घरच्या वडिलांकडून मिळालेल्या सामाजिक संस्कारांमुळे,

अजिंक्यने आपल्या खाऊसाठी गोळा केलेले ११,७३० रुपये ‘एक उब जाणीवेची’ संस्थेला दान केले,

ज्यामुळे गरजू आणि वृद्ध नागरिकांना मदत मिळणार आहे.

तान्हा पोळा निमित्ताने घरोघरी जाऊन पैसे जमा केलेल्या अजिंक्यने कोणतीही लालसा

न बाळगता ही रक्कम समाजासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.

त्याच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल जे.सी. हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर

कर्मचारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी कौतुक केले.

अजिंक्यने सांगितले की, तान्हा पोळा केवळ खाऊसाठीचा दिवस नसून,

तरुणाईमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा अवसर आहे

आणि त्यातून गरजू लोकांच्या मदतीसाठी योगदान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

read also:https://ajinkyabharat.com/dhadak-action/