जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान

आयसीसीन

आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ मंगळवारी जाहीर केले आहेत.

जून महिन्यातील दमदार कामगिरीसाठी आयसीसीनं हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

आयसीसीनं महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंपैकी दोघांची

Related News

प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार विजेते म्हणून निवड केली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही भारतीय खेडाळूंचा समावेश आहे.

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाचा आयसीसीनं गौरव केला आहे.

आयसीसी मेन्स क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला

प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तर, स्मृती मानधनाला प्लेअर ऑफ द मंथ वुमन्स क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आलं आहे.

जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या.

जसप्रीत बुमरहानं टी 20 वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देखील पटकावला.

याशिवाय बुमरहाला आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केला आहे.

या शर्यतीत भारताचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाझ होता.

मात्र, जसप्रीत बुमराहनं त्यांना पिछाडीवर टाकलं.

जसप्रीत बुमरहानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या.

बुमरहानं आयरलँड विरुद्ध 3, पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट घेतल्या.

इंग्लंड विरुद्ध जसप्रीत बुमरहानं 2 विकेट घेतल्या.

याशिवाय दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या फायनलमध्ये देखील बुमराहनं 18 धावा देत 2 विकेट घेतल्या.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरहानं आयसीसीनं केलेल्या बहुमानाबद्दल

कुटुंबीय आणि रोहित शर्मा, रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आभार मानले आहेत.

रोहित शर्मा आणि रहमानुल्लाह गुरबाझ या दोघांनी देखील त्या काळात चांगली कामगिरी केली होती.

त्यांचे देखील आभार मानतो.

मात्र, प्लेअर ऑफ द मंथ म्हणून आयसीसीनं निवड केल्याननं आनंदी असल्याचं बुमराह म्हणाला.

टीम इंडियाच्या महिला संघाची खेळाडू स्मृती मानधना हिचा देखील

आयसीसीकडून गौरव करण्यात आला आहे.

स्मृती मानधना हिनं दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेत केलेल्या

दमदार कामगिरीमुळं आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार दिला आहे.

स्मृती मानधना हिनं हा पुरस्कार तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदा मिळवला आहे.

या पुरस्काराच्या शर्यतीत इंग्लंड आणि श्रीलंकेच्या खेळाडू होत्या.

स्मृती मानधना हिनं दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तीन पैकी दोन सामन्यांमध्ये शतक झळकावलं.

तिसऱ्या मॅचमध्ये तिनं 90 धावा केल्या, तर, कसोटीमध्ये देखील स्मृती मानधना हिनं शतक झळकावलं.

Read also: https://ajinkyabharat.com/worli-hit-and-run-case-main-accused-mihir-shahala-stuck/

Related News