जानोरी-मेळ घाटातून वाळू तस्करांची दादागिरी; महसूल प्रशासन डोळेझाक

जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहे या वाळू चोरांकडे अतिशय अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे असे निष्कर्ष गावकऱ्यांमार्फत काढण्यात येत आहे एकीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहे

या वाळू चोरांकडे अतिशय अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे असे निष्कर्ष गावकऱ्यांमार्फत काढण्यात येत आहे एकीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साहेबांनी सांगितले की घरकुलधारकांना वाळू दिल्या जाणार आहे पण ती वाळू घरकुलधारकांना न देता वाळू चोरांच्या घशात ती जात आहे

Related News

कुठल्याही प्रकारची महसूल न देता अतिशय दादागिरीने दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने या घाटातून चोरी होत आहे

खूप मोठ्या प्रमाणात ही चोरी होत आहे याकडे बाळापुर महसूल अधिकारी कसे सुस्त बसलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे

कदाचित अर्थपूर्ण व्यवहार झालेला असेल म्हणूनच महसूल अधिकारी गप्प आहेत कारण जानोरी मेळ हे गाव बुलढाणा जिल्ह्याच्या

सीमेला लागून आहे त्यामुळे पूर्णा नदीतून खूप मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू आहे यांना कुणाचेही भय नाही तर यांना

नेमके अभय कुणाचे आहे कुठल्या बड्या राजकारणाचे यांच्या खांद्यावर हात आहेत की काय घरकुलधारकांना वाळू मिळेनाशी झाली पण मात्र या

वाळू चोरांना दिवसाढवळ्या एवढी मोठी हिम्मत आली कुठून तर महसूल प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन जानोरीमेळ घाटात होणारा

उपसा त्वरित थांबवावा तसेच मागील वर्षी तहसीलदार राहुल तायडे साहेब यांनी खूप मोठी मोहीम राबवली होती त्यावेळेस वाळू चोरांचे

धाबे दणाणून गेले होते त्या प्रकारचीच कार्यवाही आत्ताच्या क्षणी या घाटामध्ये व्हायला पाहिजेत तसेच तिथं शेतकऱ्यांनी ज्वारी गहू पेरलेला आहे

त्यांना सुद्धा या वाळू चोरांचा खूप त्रास आहे तसेच जानोरीमेळ घाटाला लागून शेतकऱ्यांच्या शेती आहेत त्या शेतीला पावसाळ्यात खूप

मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते कारण वाळू चोरांनी सहाय्याने खूप मोठे खड्डे करून ठेवलेले आहेत त्यामुळे वाण

नदीतून येणारे संपूर्ण पाणी हे जानोरी मेळ येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/citizens-protest-due-to-poor-condition-of-kutasa-to-dahihanda-road-demand-of-public-representatives-to-give-attention/

 

Related News