जानोरी मेळ जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था;

जानोरी मेळ जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था;

अजिंक्य भारत, जानोरी मेळ प्रतिनिधी

निंबा अंदुरा सर्कलमधील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी मेळ

येथे सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 1965 साली स्थापन झालेल्या

Related News

या शाळेत सध्या केवळ 32 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शाळेला अनेकदा सरकारी निधी उपलब्ध झाला असूनही, ग्रामपंचायत प्रशासनाने या शाळेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे.

नादुरुस्त शौचालये, निकामी पाण्याच्या टाक्या

शाळेत सध्या पाच शौचालये असून ती पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रोजच्या गरजांसाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्याही निकामी झालेल्या असून, स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आभार भिंतीसाठी मंजूर निधीही अडकला

शाळेला 20 लाखांचा निधी आभार भिंतीसाठी मंजूर झाला होता, मात्र त्या कामाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.

शाळेतील अंगणवाडी केंद्रालाही वीज पुरवठा नाही, आणि यावर वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शिक्षण समिती अध्यक्षांची नाराजी

शाळेचे शिक्षण समिती अध्यक्ष दिगंबर दामोदर काळे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत प्रशासनाकडे आम्ही वारंवार विनंती केली आहे.

आभार भिंतीचे काम, शौचालयांची दुरुस्ती, अंगणवाडीमध्ये वीज जोडणी यासाठी निवेदन दिले आहे.

मात्र प्रशासनाने आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे.”

सण-उत्सवांना उपस्थिती, पण काम शून्य

26 जानेवारी, 15 ऑगस्ट यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत

सदस्य शाळेला भेट देतात, सकारात्मक आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होत नाही.

त्यामुळे गावकरी, पालक आणि विद्यार्थी सर्वच निराश आहेत.

स्थानिक पत्रकारांचाही आवाज दुर्लक्षित

स्थानिक पत्रकारांनीही शाळेच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून दिलं, मात्र त्यांच्याही मागण्या दुर्लक्षित करण्यात आल्या.

ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक पावलं उचलणार का, याकडे आता संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolachaya-ugra-gavat-gruh-panitanchai/

Related News