जम्मू-कश्मीरमध्ये ‘शोधून शोधून ठोकलं’;

जम्मू-कश्मीरमध्ये ‘शोधून शोधून ठोकलं’; पुलवामात 3 दहशतवादी ठार, 48 तासांत 6 चा खात्मा

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून,

पुलवामा आणि त्राल भागात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

गुरुवारी पुलवामात 3 दहशतवादी ठार करण्यात आले, तर आज त्रालच्या नादेर गावात

Related News

झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 3 दहशतवादी – आसिफ अहमद शेख,

आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट ठार झाले.

ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून,

या हल्ल्याचा संबंध या दहशतवाद्यांशी आहे का, याची चौकशी सुरू आहे.

गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी त्रालमधील नादेर गावाला वेढा घालून कारवाई केली.

दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

ही मोहिम अद्याप सुरू असून दहशतवाद्यांना शोधून ठार करण्याची रणनीती सुरक्षा दलांनी

अवलंबली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून,

जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyay-darodakhoracha-kahr/

Related News