छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात दरोडेखोरांनी थैमान घातलं आहे.
बजाजनगर येथील नामांकित उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी
तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरून नेली.
Related News
दरोडेखोरांनी केअरटेकरला बंदुकीचा धाक दाखवत हातपाय बांधून ठेवले आणि संपूर्ण घराची झडती घेतली.
घटना घडली तेव्हा लड्डा कुटुंब अमेरिकेत गेले होते, हीच संधी साधून दरोडा टाकण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट तज्ज्ञ पाठवत तपास सुरू केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, अंतापूर शिवारातही एका शेतवस्तीवर दरोडा टाकण्यात आला असून,
त्यात 3 तोळे सोने आणि इतर ऐवज चोरला गेला आहे. या दोन्ही घटनांमुळे वाळूज परिसरातील नागरिक
व उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून दोन्ही घटनेचा कसून तपास सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/minister-asun-ash-language/
