सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा गावात अवैध जुगार, दारू आणि मटका यांसारखे धंदे खुलेआम सुरू असून, त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी केली आहे. या सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी महिला मंडळ व ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, जांभोरा हे किनगाव राजा पासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेले गाव असून, येथे देशी दारूची तीन दुकाने सुरू आहेत. किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या गावात काही व्यक्तींनी जुगार, दारू विक्री आणि मटका यांचे अड्डे राजरोसपणे सुरू केले आहेत. या अवैध व्यवसायांमुळे गावातील तरुण वर्ग नशेच्या आहारी जात असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूमुळे आत्महत्येच्या घटनाही घडत असून, गावातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे.
महिलांनी निवेदनात नमूद केले आहे की, या सर्व अवैध प्रकारांमुळे जांभोरा गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे गंभीर प्रकरण आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गावातील अवैध व्यवसायांवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Related News
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
‘Hanuman Ansh’ची टीम थेट ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक, आगामी प्रकल्पांसाठी दिल्या शुभेच्छा
बॉक्स ऑफिसवर सध्या ‘Hanuman Ansh’ या आध्यात्मिक चित्रपटाची चर...
Continue reading
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
Continue reading
राज्यात दुष्काळाचं सावट; पालकमंत्र्यांना शेतात जाऊन पाहणीचे आदेश, शेतकऱ्यांसाठी सर्वेक्षण सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश; क...
Continue reading
चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्यावरून रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान; म्हणाले, “असेल हिंमत तर दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या”
चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून ...
Continue reading
Manoj Jarange Patil : पॅरिसमधून रात्रभर सूत्रे हलली अन् जरांगेंनी उपोषण सोडलं; पडद्यामागे नेमकं काय घडलं?मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil यांनी सुर...
Continue reading
फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावरून म्हणाले, “हे नाकार्त्यांचं आंदोलन”
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसे...
Continue reading
जीआर आला! मराठा आरक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय; शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नवी जागा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले अ...
Continue reading
Disha Salian : ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंची गूढ पोस्ट चर्चेत, नेमका कोणावर निशाणा?
Disha Salian प्रकरण, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नावांवरील चर्चा तसेच अ...
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्...
Continue reading
या निवेदनावर “अमले विश्वासू” यांची स्वाक्षरी असून, तो बुलढाणा येथे सादर करण्यात आला आहे. निवेदनावर तिशी ते चाळीस महिलांच्या स्वाक्षऱ्या असून, याची प्रत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस, पोलिस निरीक्षक किनगाव राजा, पोलिस उपनिरीक्षक देऊळगाव राजा आणि तहसीलदार देऊळगाव राजा यांनाही पाठविण्यात आली आहे.
ग्रामस्थ आणि महिलांनी मागणी केली आहे की, जांभोरा गावात आणि शिवारात सुरू असलेले सर्व अवैध जुगार, दारू आणि मटका व्यवसाय त्वरित बंद करून गावात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था टिकवली जावी. महिलांनी प्रशासनाने ठोस पावले उचलून तरुण पिढीचे भविष्य वाचवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/election-announcement/