कुरणखेड: राष्ट्रीय महामार्ग 53 वरील दाळंबी येथील वत्सल्यधाम वृद्धाश्रमात जैन साधुसंतांच्या
पावन उपस्थितीने वातावरण भक्तिमय झाले आहे. नागपूर येथून पुढील प्रवासासाठी निघालेल्या जैन
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनीश्री अर्हत् कुमारजी, मुनीश्री भरत कुमारजी,
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आणि मुनीश्री जयदीप कुमारजी यांनी वृद्धाश्रमात मुक्काम केला.
मुनीश्रींनी सत्संगाच्या माध्यमातून उपस्थितांना जीवनाचे खरे उद्दिष्ट समजावले.
“मनुष्य जीवन हे जप, तप, भक्ती, आणि साधनेने अधिक पवित्र होते. मांसाहार, मद्यपान
यासारख्या गोष्टींना दूर ठेऊन आपले जीवन भक्तीमय करा,” असे त्यांनी सांगितले.
वृद्धाश्रमाचे संचालक रवी राठी यांनी जैन साधुसंतांसाठी नेहमीच आश्रमात मुक्कामाची व्यवस्था केली असल्याचे नमूद केले.
येथे हिंदू व जैन धर्मातील अनेक साधुसंतांचे आगमन होत असते, ज्यामुळे वत्सल्यधाम आध्यात्मिकतेने पावन झाले आहे.
सत्संग प्रसंगी आश्रमाचे संचालक रवी राठी, व्यवस्थापक योगेश विजयकर यांच्यासह अकोल्याहून आलेले प्रविण सेठिया,
प्रकाश गधैया, नवलचंद कोचेटा यांसारखे भाविक उपस्थित होते.
जैन मुनींच्या प्रवचनाने वृद्धाश्रमातील रहिवासी व भक्तांना नवीन प्रेरणा मिळाली.
उपस्थितांनी या सत्संगातून मिळालेल्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला.
वृद्धाश्रमातील अशा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे वृद्धांना मानसिक आधार व शांती मिळते, असे मत भाविकांनी व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/appeal-for-help-for-somnath-suryavanshis-family-state-governments-help-rejected/