जयदीप आपटेला मालवण पोलीस स्थानकात आणलं

कल्याणमधून

कल्याणमधून करण्यात आली होती अटक 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला

जयदीप आपटे अखेर सापडला आहे. कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी

शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी अटक केली आहे. कुटुंबीयांना

भेटायला आलेला असताना जयदीप आपटेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

दरम्यान आज जयदीप आपटेला घेऊन पोलीस मालवण पोलीस स्टेशनमध्ये

दाखल झाले आहेत.

जयदीप आपटे सरकारचा नातेवाईक आहे, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरु

असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली

आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.  मालवणमधील शिवरायांचा पुतळा

कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेतल. दोन

आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या

राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

जयंत पाटील म्हणाले, जयदीप आपटे हा सरकारचा नातेवाईक आहे.  कंत्राटही

त्याला दिलं आता जामीनही त्याला देण्यासाठी प्रयत्न करतील. ⁠त्याच्याकडे पात्रता

नसतानाही त्याला काम देण्यात आलं आहे.  सरकारला हे भोगाव लागेल  तसेच

याची किंमत मोजावी लागेल.

जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास मालवण

दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. चेतन पाटील यांची पोलीस कोठडी

आज संपत असून पोलिस तपास करायचा असल्यास त्यांच्या पोलीस कोठडीची

मागणी केली जाणार आहे. तर मुख्य  आरोपी जयदीप आपटे याची तपासाअंती

चार्जशीट दाखल केली जाणार त्यात जयदीप आपटे याची चौकशीत काय काय अपेक्षित

आहे त्यानुसार पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी

वकिलांनी दिली आहे. तर जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी मालवण न्यायालय

परिसरात दाखल झाले आहे. मुंबईवरून विमानाने ते गोव्यात आले. तिथून कारने

मालवणमध्ये दाखल झाले आहे.  त्यांच्या सोबत स्थानिक वकील अॅड राजू परुळेकर असणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/khamgaon-school-teacher-insults-student/