जय शिवाजी जय भारत पदयात्रा

जय शिवाजी जय भारत पदयात्रा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त अकोला शहरात भव्य आयोजन

अकोला, दि. १९ फेब्रुवारी २०२५: केंद्र सरकारच्या युवा आणि क्रिडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे.

या निमित्ताने अकोला शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहेय…

Related News

ही पदयात्रा वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथून सुरू होऊन संतोषी माता चौक,

अकोट स्टॅन्ड, माणिक टॉकीज, सिटी कोतवाली चौक, सरकारी बगीच्या चौक,

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे समाप्त झालीय… या यात्रेत हजारो शिवभक्त,

विद्यार्थी, युवक-युवती, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झालंय होतेय..

या विशेष आयोजनामागील उद्दिष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या

विचारांचे आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करणे तसेच

तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे. पदयात्रेदरम्यान शिवचरित्रावर

आधारित घोषवाक्ये आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या घोषणा दिले होतेय..

यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने व्यापक तयारी केली असून,

नागरिकांनीही मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार

होण्याचे आवाहन करण्यात आले होतेय… जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी

अधिकारी बी वैष्णवी महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने निवासी उपजिल्हा

अधिकारी विजय पाटील यांच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर,

पोलीस प्रशासन व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता…

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/akolkhed-yehet-rural-poolsakadun-root-march/

Related News