जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल

जळगाव –

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना डंपरद्वारे ठार मारण्याची धमकी देणारा खळबळजनक ई-मेल मुख्यमंत्री

कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये केवळ जिल्हाधिकाऱ्यांनाच नव्हे,

Related News

तर जळगाव जिल्ह्यात दंगली घडविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याचे नमूद करत त्यांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने हा ई-मेल तत्काळ जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवला असून,

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात

सायबर सेलकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून मेल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले की,

यापूर्वीही अशा प्रकारचे तीन ते चार मेल आले होते. त्यामधील भाषा पाहता यामागे कोणी

शरारती प्रवृत्तीचा व्यक्ती असण्याची शक्यता आहे. मात्र तरीही तपास गांभीर्याने सुरू आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिलं की, या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

Read Also : https://ajinkyabharat.com/ahmedabadamadhye-apartmentla-fire/

Related News