महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना IPS काम्या मिश्रा
यांचा राजीनामा समोर आला आहे. बिहारची ‘लेडी सिंघम’ म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी अचानक राजीनामा दिला.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्या बिहारमधील दरंभगा येथे ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या.
22 व्या वर्षी आयपीएस झालेल्या काम्या मिश्रा यांनी केवळ
5 वर्षांत नोकरीचा राजीनामा दिला. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात
त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. सुरुवातीला त्यांना हिमाचल केडर मिळाले होते,
त्यानंतर बिहार केडरमध्ये त्यांचे स्थलांतर करण्यात आले.
काम्या मिश्रा यांचे पती अवधेश सरोज पोलीस अधीक्षक आहेत.
काम्या मिश्रा यांनी सांगितले की, राजीनामा देण्याचा निर्णय कठीण होता.
परंतु नोकरीत मन लागत नव्हते. इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर
नोकरी सोडताना खूप दु:ख होत आहे. परंतु आमचा खूप मोठा उद्योग आहे.
मी एकटी मुलगी आहे. तसेच नोकरीमुळे परिवारास वेळ देऊ शकत नाही.
त्यामुळे राजीनामा देण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.
काम्या मिश्रा मार्च 2024 मध्ये पहिली ग्रामीण एसपी बनल्या.
यूपीएससी परीक्षेत त्यांनी 172 रँक मिळवला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/500-prisoners-released-from-bangladesh-jail/