Inzamam-ul-Haq and Saqlain Mushtaq : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम ऊल हक आणि
दिग्गज फिरकीपटू सकलैन मुश्ताक यांच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या दोघांचे पूर्वज भारतीय आहेत. त्यांचे भारताशी असलेले संबंध त्यांनीच सांगितले आहे.
Related News
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इंजमाम ऊल हक आणि दिग्गज फिरकीपटू सकलैन
मुश्ताक या दोघांनी त्यांच्या संघासाठी जीवाचे रान केले आहे. त्यांनी अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत.
इंजमामची खेळी नेहमी स्मरणात राहण्यासारखी आहे. तर दुसरीकडे सकलैन मुश्ताकच्या फिरकीने
दिग्गज फलंदाजांना रडकुंडीला आणले होते. निवृत्तीनंतर दोघांच्या वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा झडत आहे.
दोघांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात या दोघांनी भारताशी असलेला संबंध जाहीर केला आहे.
त्यांनी त्यांचे पूर्वज भारतीय असल्याचे सांगितले . तर कपिल शर्माशी त्यांचे कनेक्शन काय हे पण सांगितले.
सकलैन मुश्ताक हिंदू?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत सकलैन मुश्ताक याने
मुलाखतीत त्याचे कुटुंबिय हे मुळचे भारतीय असल्याचा दावा केला आहे. त्याचे कुटुंबिय हे अमृतसर येथील असल्याचे तो सांगतो.
त्याच्या आजोबाचे नाव रूड सिंह होते, अशी माहिती तो देतो. आपण पूर्वी हिंदू होतो. त्यानंतर मुसलमान झालो.
लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा हा सुद्धा आपल्याच गावचा असल्याचे सकलैन म्हणाले.
कपिल शर्मा याचे आणि आपले गाव एकच आहे. दुबईत कपिलला भेटलो,
तेव्हा आपण ही गोष्ट त्याला सांगितल्याचे सकलैन याने या मुलाखतीत सांगितले.
इंजमाम तर हरियाणातील हिस्सारचा
याच व्हिडिओत इंजमाम ऊल हक यांने पण त्याच्या कुटुंबियाचे भारतीय कनेक्शन समोर आणले.
हरियाणातील हिस्सार हे त्यांच्या पूर्वजांचे गाव असल्याचे तो म्हणाला. 2004-05 दरम्यान आपण भारतात आलो होतो.
आपले वडील हे हिस्सार येथूनच पाकिस्तानमध्ये आले होते. हांसी हे आमचे मूळ गाव आहे. मला या गावी जाण्याची इच्छा होती.
पण कामाची व्यस्तता म्हणा अथवा सुरक्षेचे कारण मला तिथे जाता आले नाही, असे ही तो म्हणाला.
माझ्या कुटुंबातील काही लोक तिथे गेले होते. तिथल्या लोकांनी त्यांचे अभूतपूर्व असे स्वागत केले. आम्ही ज्या घरी राहायचो,
तो अजूनही शाबूत आहे. चांगल्या स्थितीत आहे. आमचा मोठा वाडा होतो. तो ही आहे, थोडा लहान झाला आहे,
पण सुस्थितीत आहे. गावातील लोकांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांना प्रेमाची वागणूक दिल्याचे इंजमाम याने आवर्जून सांगितले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/beed-case/