असह्य आजारातून केली महिलेची सुटका, 13 लाखाची मदत

आमदार नितीन देशमुख यांचे विशेष सहकार्य

विवरा  : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या किरण बर्डे ही महिला (वय ३० वर्षे) पोटाच्या विकाराने त्रस्त होती.
  अकोला,अमरावती व नागपूर येथे तज्ञ डाॅक्टरांकडे अनेकदा उपचार घेतले परंतु त्यांना म्हणावा तसा आराम मिळाला नाही अनेकांनी त्यांना विविध नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबवायला सांगितल्या तरीही काही फरक पडला नाही.रूग्णसेवक मंगेश केनेकर यांनी या महिलेला मदत मिळवून देत तिचे तीन वेगवेगळे ऑपरेशन यशस्वी करून तिला होणा-या असह्य त्रासातून मुक्त केले
  अशात त्यांना विवरा येथील रहिवासी  तसेच रूग्णसेवक संघटनेच्या माध्यमातून अनेक गरीब रूग्णांना जीवदान देणारे रूग्णसेवक मंगेश केनेकर यांची माहिती मिळाली. केनेकर यांनी क्षणाचा विलंब न करता रूग्ण किरण बर्डे यांच्या वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांकडे पाठवले.डाॅक्टरांच्या सुचनेनुसार रूग्ण महिलेस ताबडतोब मुंबई येथे रूग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांना उपचारासाठी जवळपास 13 लाख रुपये खर्च येणार असल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर यांना माहिती दिली.  रूग्णालयाचे कोटेशन घेतले व मुंबई येथील रूग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देणा-या धर्मादाय संस्था गाठल्या.
  सिद्धीविनायक गणपती,रतन टाटा ट्रस्ट, बिग वुमेन ट्रस्ट कमलाबाई आहुजा ट्रस्ट, गणपती संस्थान ट्रस्ट घाटकोपर, जोसेफ फर्नांडिस ट्रस्ट,विमल आहुजा ट्रस्ट,मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी सह अन्य संस्थांची १३ लाख ७६ हजार रूपयांची मदत मंगेश केनेकर यांनी या महिलेला मिळवून देत तिचे तीन वेगवेगळे ऑपरेशन यशस्वी करून तिला होणा-या असह्य त्रासातून मुक्त केले. किरण बर्डे व त्यांच्या परिवाराने त्यांना मदत केलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.आमदार नितीन देशमुख यांनी सुद्धा विशेष सहकार्य व आर्थिक मदत सुद्धा केली.