इंस्टाग्रामवरील सुपरस्टार्स

📲 इंस्टाग्रामवरील सुपरस्टार्स: सर्वाधिक फॉलोवर्स असलेले 7 भारतीय क्रिकेटपटू

आजच्या सोशल मीडियाच्या युगात क्रिकेटपटू केवळ मैदानावरच नव्हे, तर इंस्टाग्रामसारख्या

प्लॅटफॉर्मवरही तितकेच लोकप्रिय ठरत आहेत. चाहत्यांना त्यांच्या खेळाबरोबरच लाइफस्टाइल,

फॅमिली मोमेंट्स आणि मजेशीर व्हिडिओ देखील खूप आवडतात.

Related News

सध्या कोणते भारतीय क्रिकेटपटू इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलं जातंय, ते पाहूया…

१. विराट कोहली – २७०.३ मिलियन फॉलोअर्स

इंस्टाग्रामचा सम्राट!

  • फिटनेस, स्टाईल, अनुष्कासोबतचे फनी व्हिडिओ आणि कौटुंबिक क्षण

  • जगातला सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू

२. सचिन तेंडुलकर – ५०.४ मिलियन फॉलोअर्स

‘क्रिकेटचा देव’ आता सोशल मीडियावरही हिट

  • मोटिवेशनल पोस्ट्स, जुन्या आठवणी आणि सामाजिक कार्य

३. रोहित शर्मा – ४३.१ मिलियन फॉलोअर्स

‘हिटमॅन’ रोहितचा शांत आणि दिलखुलास अंदाज

  • कौटुंबिक क्षण, मैदानावरी भन्नाट शॉट्स आणि एक जबरदस्त डॅड इमेज

४. सुरेश रैना – २७.६ मिलियन फॉलोअर्स

‘Mr. IPL’ म्हणून ओळख

  • फिटनेस, फॅमिली आणि संगीताचा छंद

५. के. एल. राहुल – २२.१ मिलियन फॉलोअर्स

स्टाईल आणि रोमँसचा परफेक्ट मिक्स

  • बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबतचे रिलेशनशिप आणि ग्लॅमरस आयुष्य

६. युवराज सिंग – २०.६ मिलियन फॉलोअर्स

सिक्सर किंग युवी

  • प्रेरणादायी कथा, जुन्या क्रिकेट आठवणी आणि धमाल रील्स

७. शिखर धवन – १९.१ मिलियन फॉलोअर्स

‘गब्बर’चा बिंदास अंदाज

  • डान्स, विनोद आणि सकारात्मकता याचा सुंदर संगम

हे सातही क्रिकेटपटू दाखवतात की मैदानावरील त्यांच्या खेळीइतकीच सोशल मीडियावरील त्यांची पकडही मजबूत आहे.

विराट कोहलीचा ग्लॅमर असो, की शिखर धवनचा विनोदी अंदाज — क्रिकेट + कंटेंट = हिट कॉम्बिनेशन.

Read Also : https://ajinkyabharat.com/chief-ministerial-lake-divija-dahawit-chamkali/

Related News