ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट
सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ
निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागात
वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह
तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : भारत पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी ची मॅच भारताने जिंकल्यावर सगळीकडे जल्लोष साजरा होत
असतानाच मारून मध्ये एक राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
Related News
बौद्ध बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त 200 रुपये प्रतिमाह आजीवन त्याग करा – अजय घनबहादूर
भव्य ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीने कार्यक्रमास सुरुवात
अकोट शहरातील लोहारी मार्गावरी...
Continue reading
सी. एस. परमेश्वर यांची इंडो-अमेरिकन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड
श्री. सी. एस. परमेश्वर, परामिन अॅडव्हर्टायझिंग & मार्केटिंग असोसिएट्सचे
Continue reading
मोठा हल्ला! अफगाण सैन्याने पाकिस्तानवर धडक हल्ला; 12 सैनिक ठार, 5 जखमी, सीमा चौक्या ताब्यात
सैनिक हा शब्द देशाच्या संरक्षणाशी थेट संबंधित आहे. सैनिक म्ह...
Continue reading
अमिताभ बच्चन कोमात होते तेव्हा… रेखा पांढरी साडी नेसून आल्या आणि… जया बच्चन मात्र…
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं प्रेम म्हणजे अमिताभ बच्चन...
Continue reading
अकोला जिल्हा क्रिकेट स्पर्धा 2025: हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाचा गौरव
अकोला जिल्हा पातळीवरील अंडर-17 क्रिकेट स्पर्धेत हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापूरने
Continue reading
मराठमोळी अभिनेत्री मयुरी वाघचा खुलासा: पूर्व पतीकडून मानसिक व शारीरिक छळ, घटस्फोटानंतर पहिल्यांदा मोठा खुलासा
घटस्फोट हा निर्णय कोणत्याही व्यक्तीसाठी सोपा नसतो. लग्नातील समस्या, ...
Continue reading
दिवाळीपूर्वीच मुंबईकरांचा खोळंबा: मध्य रेल्वेवर 30 तासांचा मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. खरेदी, भेटवस्तूंची तयारी आणि सणाच्...
Continue reading
निपाणा येथील बकऱ्या पाणी समजून डांबरात फसल्याने गंभीर जखमी; खाजगी कंपनीवर पशुपालकांचा रोष
अकोला तालुक्यातील निपाणा गावात एका गंभीर प्राणी अपघाताची घट...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं, ‘या’ महिलेने शांततेच्या नोबेल पुरस्कारावर कोरलं नाव
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी...
Continue reading
८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; “शांत राहूनच मी माझी लढाई लढते”
बॉलिवूडची अग्रगण्य अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आहे, आणि यावेळी कारण...
Continue reading
दानापुर-माळेगाव रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात; अपघातांचा धोका वाढला
दानापुर-माळेगाव रस्ता सध्या बंगाली काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकल...
Continue reading
युजवेंद्र चहलचा धनश्री वर्माच्या फसवणुकीच्या आरोपांवर सडेतोड प्रत्युत्तर; रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश...
Continue reading
याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक केली आहे.
शिवसेनेचे युवा नेते आमदार निलेश राणे यांनीही राष्ट्राविरोधी घोषणा देणाऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत
समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागात वास्तव्यास
असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी पोलिसांत दिली आहे.
वराडकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
आंगणेवाडी यात्रेतून काल रात्री माघारी परतल्यानंतर शहरातील वायरी येथील मित्राकडे जात असताना
रात्रौ साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती.
भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान त्यातील एक मुलगा हा भारत देशाच्या विरोधात घोषणा देत होता.
त्याला याबाबत विचारणा केली असता तो पळून गेला. त्यानंतर तो मुलगा हनुमान मंदिर येथे दिसला.
त्याला पुन्हा विचारले असता त्याने आपल्या वडिलांना भेटा असे सांगितले. त्याच्या वडिलांची भेट घेत माहिती दिली असता,
त्यांनीही देशाच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली.
याची माहिती वराडकर याने मित्र हरेश पडते याला दिल्यानंतर घटनास्थळी भाऊ सामंत, संतोष लुडबे,
विजय केनवडेकर, अवि सामंत, आप्पा लुडबे, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर यांच्यासह हिंदू बांधव जमा झाले.
सर्वांनी त्या भंगार व्यवसायिकांना देशाच्या विरोधात घोषणा देणे योग्य नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही त्यांनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या.
त्यांच्या या कृत्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण झाली. या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक प्रवीण् कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
More update here
https://ajinkyabharat.com/college-tarunankan-karanama-ughdakis-gungicia-drugsah-1-lakh-42-thousand-rupees/