झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात बदल.

टी २० वर्ल्ड कप

टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.

या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे.

Related News

या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे.

मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.

पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा

यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.

सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.

सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.

त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत.

ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी सामन्यांसाठी

रवाना होतील.

दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना

आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल २०२४ दरम्यान

बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती.

त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/a-total-of-14-applications-including-both-the-candidates-for-the-legislative-council/

Related News