indian railways new app: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी लोक
प्रवास करतात. आता भारतीय रेल्वे एक अॅप लॉन्च करत आहे.
या अॅपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग, प्लॅटफॉर्म तिकीट
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
, पार्सल बुकींग, जेवणाची ऑर्डर अशा अनेक सुविधा असणार आहे.
रेल्वेचे अॅप 2024 च्या अखेरपर्यंत किंवा जानेवारी 2025 पर्यंत लॉन्च होणार आहे.
या सुपर अॅपमध्ये व्यक्ती आपल्या गरजेनुसार सुविधांची निवड करु शकणार आहे.
रेल्वेच्या सुविधांसाठी यापूर्वी आयआरसीटीसी रेल कनेक्ट,
ई-कॅटरिंग, रेल मदद आणि युटीएस असे वेगवेगळे अॅप वापरावे लागत होते.
आता या सर्व सुविधा एकच अॅपवर उपलब्ध होणार आहे.
रेल्वेचे अॅपमध्ये दोन पर्याय असणार आहे. पहिला पॅसेंजर तर दुसरा फ्रेट पर्याय आहे.
पॅसेंजर सेक्शनमध्ये आरक्षीत, अनआरक्षीत तिकीट, फ्लाइट तिकीट, धार्मिक ट्रेन, टूर पॅकेज, हॉटेल आणि कॅब बुकींग यासारख्या सुविधा असणार आहे.
दुसऱ्या फ्रेट सेक्शनमध्ये मालगाडीचे नोंदणी, पार्सल बुकिंग आणि थोक आयटम बुकींग असणार आहे.
रेल्वेचे हे अॅप आयआरसीटीसी द्वारा इंटीग्रेट केले जाणार आहे.
त्यामुळे प्रवाशांसाठी असणारे हे एकमेव अॅप असणार आहे.
सध्या आयआरसीटी अॅपचा सर्वाधिक वापर होत असतो. त्यामाध्यमातून तिकीट बुकींग, ट्रॅकींग केली जाते.
नवीन सुपर अॅप फक्त तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग करणार नाही तर ट्रेनमध्ये जेवणाची ऑर्डर
, रिटायरिंग रूम आणि एक्जीक्यूटिव्ह लाउंज बुकींग या सुविधाही मिळणार आहे. सुपर अॅपमुळे
प्रवाशांना प्रत्येक सुविधा मोबाईलमध्ये मिळणार आहे.
सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम (सीआरआयएस) द्वारा हे अॅप विकसित केले आहे. त्याला
आयआरसीटीसी बरोबर जोडले आहे. यामुळे प्रवाशांना वेगवेगळे अॅप वापरण्याची गरज पडणार नाही.