भारताच्या हॉकी संघानं ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश 

पॅरिस ऑलिम्पिक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये  भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शुट आऊटमध्ये

ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केलं आहे.  पेनल्टी शुट आऊटमध्ये

भारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Related News

दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्यानं मॅचचा निकाल

पेनल्टी शुट आऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर

श्रीजेश यानं जोरदार बचाव केल्यानं आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी

पेनल्टी शुट आऊटमध्ये 4  गोलं केल्यानं ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला.

भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.

ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वार्टरमध्ये

दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या क्वार्टरनंतर भारताचा

अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आलं.

त्यामुळं तो बाहेर गेला यानंतर भारताचा कॅप्टन  हरमनप्रीत सिंग यानं एक गोल केला.

त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टन यानं गोल केल्यानं1-1 अशी बरोबरी झाली.

त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही.

भारताच्या बचाव फळीनं  दमदार कामगिरी करत ब्रिटनला

पुन्हा एकही गोल करु दिला नाही. पुढच्या दोन्ही क्वार्टरमध्ये भारताच्या बचाव फळीनं

आणि गोल कीपर श्रीजेशनं बचाव करत ब्रिटनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले.

अखेर मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथं भारतानं 4-2 असं ग्रेट ब्रिटनला पराभूत केलं.

Read also: https://ajinkyabharat.com/amit-shahs-protestors-attacked/

Related News