पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते

स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आजपासून

प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो

Related News

मार्गाचं पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं

आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा

दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे पुण्यात उपस्थित

आहेत, या मेट्रोमधून आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित

नेते महिला आणि लहान मुले पहिल्यांदा प्रवास करणार आहेत,

त्यांनतर आज दुपारी ४ वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य

प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे

लोकार्पण झाले आहे. आज संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग

प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते

स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर

जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट अशी 4 मेट्रो

स्थानके आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9c-%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be/

Related News