राज्य राजकारणात महत्त्वाचा टप्पा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर

राजकारणात

दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण?

महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाच्या टप्प्याचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या असून आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचे विमान अपघातात कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला. त्यांच्या अचानक निधनाने राज्यात शोककळा पसरली, तर कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. तरीही, सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून कर्तव्य बजावले.

31 जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर लोकभवन येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही घटना एक शक्तीप्रदर्शन म्हणून देखील पाहिली जात आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरु होती.

Related News

आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्याआधी सुनेत्रा पवार आपला पदभार स्वीकारतील. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, पक्षाच्या एकजूट आणि शक्ती प्रदर्शनाचा संदेश देण्यात येणार आहे. हे शक्ती प्रदर्शन विशेषतः अशा काळात महत्त्वाचे ठरते, जेव्हा पक्षाच्या विलिनीकरणाबाबत राज्यातील राजकीय चर्चा जोर धरल्या आहेत.

उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतरच सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीमध्ये त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय सूत्रांनुसार, राज्यातील मित्रपक्षांसोबतही दिल्लीमध्ये खलबतं होऊ शकते.

दरम्यान, राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीने जोरदार विजय मिळवला आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्ली दौऱ्यावर गेले असून भाजप नेतृत्वाशी महत्त्वपूर्ण चर्चा करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आता राज्यातील राजकारणात मोठ्या बदलांचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यातील राजकीय तणाव, पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांमुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सक्रियतेमुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दिल्लीतील भेटींच्या निकालावरून पुढील राजकीय वाटचाल ठरू शकते. राज्यातील सर्वांची नजर आता दिल्लीकडे लागली आहे, जिथे राजकीय घडामोडींचा नवा अध्याय उलगडण्याची शक्यता आहे.

read also : https://ajinkyabharat.com/discussion-increased-due-to-merger-of-nationalist-congress-with-fadnavis-shahs-visit/

Related News