अकोट – अकोट शहरातील राजेंद्रनगर मोहल्ल्यात ०९ मार्च २०२६ रोजी घडलेल्या भयंकर खुन प्रकरणातील आरोपींवर पोलीसांनी त्वरित कारवाई केली. फिर्यादी दुर्गा लखन अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या जुन्या वादातून राम पांडुरंग अंभोरे आणि इतरांनी लोखंडी पाईप, चाकू, दगड व विटांचा वापर करून लखन अंभोरे यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या लखन अंभोरे यांचा उपचारादरम्यान १० मार्च २०२६ रोजी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
पोलीस स्टेशन अकोट शहराने अप क. ३०२/२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी सहा.पोलीस अधीक्षक निखील पाटील, ठाणेदार अमोल माळवे यांचे मार्गदर्शनात घटनास्थळी पाहणी करण्यात आली. तत्काळ तपास चक्र फिरवून, गुन्ह्यातील ०६ आरोपींना अटक केली गेली आणि त्यांना न्यायालयात हजर करून ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
सदर तपासात पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, उप्पर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधिक्षक निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अकोट शहरातील अधिकारी व अंमलदारांनी तत्पर सहभाग घेतला. या कारवाईत पोलीस निरीक्षक अमोल माळवे, स.पोनि शमुवेल वानखडे, डि.बी.पथक प्रमुख पो.उपनि निलेश बारहाते, पो.उपनि अविनाश मोहीते, पो.उपनि समाधान मिसाळ, डि.व्ही.पथकाचे पो.हे.कॉ.नरेंद्र जाधव आणि इतर सहकाऱ्यांचा सहभाग होता.
Related News
पोलीस प्रशासनाच्या जलद कारवाईमुळे खुन प्रकरणातील आरोपींवर तत्काळ नियंत्रण मिळाले असून, शहरातील नागरिकांना न्यायालयीन प्रक्रिया सुरक्षित व वेगाने पार पाडण्यात येत आहे. अकोट पोलिसांनी हा संदेश दिला की कुठल्याही प्रकारच्या हिंसाचारावर त्यांचा कटाक्ष राहील.
