सावली तालुक्यातील कढोली परिसरात अवैध उत्खननावर धडक कारवाई जेसीबीसह ३ ट्रॅक्टर जप्त

सावली

सावली वनपरिक्षेत्रात अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम राबवत कढोली परिसरातून जेसीबीसह तीन ट्रॅक्टर जप्त केले. दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

व्याहाड उपक्षेत्रात रात्रगस्तीदरम्यान क्षेत्र सहाय्यक अनंत राखुंडे आणि वनरक्षक महादेव मुंढे यांनी मौजा कढोली येथील गट क्रमांक 144 मधील वनभूमीत अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आणले. तत्काळ पथकाने छापा टाकत जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 33(1)(E),कलम 35(1)(G),नुसार वन गुन्हा क्रमांक 204/212852/2025 नोंदविण्यात आला.

Related News

मल्लेश नरसय्या मेरफुलवार, रा. हांबा जेसीबी (पिवळी) – क्र. MIH-33/4487 , ट्रॅक्टर महिंद्रा B275DI (लाल) – क्र. M134/BV-5332,दोन्ही वाहने मातीने भरलेली,सिंदूबाई किसनदेव बोदलकर, रा. उपरी ट्रॅक्टर स्वराज 843XM (निळा), ट्रॉली (लाल) ,राजेश नामदेव सात्पुते, रा. उपरीट्रॅक्टर स्वराज 735FF (निळा-पांढरा)

सर्वही वाहने सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त करून ठेवण्यात आली आहेत.या मोहिमेत वनरक्षक सतिश नागोसे, रमेश बोनलवार, सतिश मजोके, बंडू दुधे, रवि सोनुले, मारोती पिपरे, नेहरू पाल आणि पीआरटी चमू यांनी मोलाचे सहकार्य केले.ही संपूर्ण कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले आणि सहायक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे पुढील तपास करीत आहेत.सावली परिसरातील अवैध उत्खननाविरोधात वनविभागाची ही धडक कारवाई नागरिकांत कौतुकास्पद ठरली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/beer-rum-fail-india-shocked-to-see-whiskey-smoke-figures/

Related News