वेब सीरिजचे चार एपिसोड हटवण्याची मागणी
कंदहार विमान अपहरणावर आधारीत असलेल्या IC 814: द कंदहार हायजॅक
ही वेब सीरिज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अनुभव सिन्हा
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
दिग्दर्शित या वेब सीरिजमागे लागलेले वादाचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत.
आधी वेब सीरिजमधील दोन दहशतवाद्यांची नावे हिंदू धर्मीय असल्यावर आक्षेप
घेण्यात आला होता. त्यानंतर आता, वृत्तसंस्था ‘एएनआय’ने निर्मात्यांविरोधात कोर्टात
धाव घेतली आहे. मागील महिन्यात 29 ऑगस्ट 2024 रोजी प्रीमियर झालेल्या
सहा भागांच्या एपिसोडमध्ये IC 814 विमानातील प्रवाशांच्या यातना, प्रवाशांची
सुटका करण्यासाठी तपास यंत्रणांकडून सुरू असलेले प्रयत्न, सरकारच्या हालचाली
यावर वेब सीरिजचे कथानक बेतले आहे. काठमांडूहून दिल्लीला जाणारे विमान
पाकिस्तानच्या पाच दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. हे विमान अमृतसरहून
लाहोर आणि त्यानंतर दुबईमार्गे तालिबानी राजवट असलेल्या अफगाणिस्तानमधील
कंदहारला नेण्यात आले. या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह,
पंकज कपूर, अरविंद स्वामी आणि मनोज पाहवा तसेच दिया मिर्झा यांसारखे दिग्गज
कलाकार आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आरोप केला आहे की, निर्मात्यांनी वेब
सीरिजमध्ये त्यांचे काही व्हिडिओ फुटेज परवानगीशिवाय वापरले आहेत. ‘बार अँड बेंच’ने
दिलेल्या वृत्तानुसार, ANI ने Netflix आणि IC 814 च्या निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल
केला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानी जनरल परवेझ मुशर्रफ
यांच्यासह प्रमुख व्यक्तींचे फुटेज योग्य परवान्याशिवाय वापरल्याचा आरोप आहे.
हे व्हिडीओ फुटेज सहा एपिसोडच्या वेब सीरिजमधील चार एपिसोडमध्ये वापरले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-will-be-in-uposhanala-basnar-from-17th-september/