संत गजानन महाराज महाविद्यालय, बोरगाव येथे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. मनोज उघडे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबळ इच्छाशक्ती, सातत्य आणि सकारात्मक वृत्तीच्या जोरावर जीवनात यश मिळवता येते, तसेच स्वयं-अवलोकन आणि समाजसेवेची महत्त्वाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. पी.एस.आय. उघडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “जग सुंदर आहे आणि ते जगता आले पाहिजे. आपल्या जवळ जे काही आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहावे. ज्या लोकांकडे काही नाही त्यांच्याकडे पाहून आपल्याला जीवनातील मूल्य समजून घ्यावे. राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे साधन मिळते.” कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रा. डॉ. पूजा सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता सुरूवातीपासून स्वतःपासून करावी, स्वतःच्या दारात झाड लावून वृक्षारोपणाची सुरुवात करावी असे आवाहन केले. याशिवाय, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निर्मळ यांनी केले, तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राठोड यांनी सादर केले. या वेळी प्रा. वासुदेव डांगे, समाजकार्य महाविद्यालयाचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
read also:https://ajinkyabharat.com/polysani-ughd-banana-fierce-truth/
