मोहाळा येथील हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मान्यवरांनी दिल्या भेटी

हिदायत पटेल

अकोट :
अकोट तालुक्यातील मोहाळा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर राजकीय, सामाजिक व ग्रामस्थ स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काल व आज अनेक मान्यवरांनी मोहाळा येथे भेट दिली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, आमदार राहुल बोंद्रे यांनी पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी सविस्तर चौकशी केली व संपूर्ण घटनेची माहिती घेतली. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका मान्यवरांनी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान महेश गणगणे, नानासाहेब हिंगणकर, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, कपिल ढोके, गजानन डाफे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मोहाळा व परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत हिदायत पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Related News

हिदायत पटेल हे सामाजिक सलोखा, लोकहित आणि काँग्रेस संघटन बांधणीसाठी ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या हत्येप्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून दोषींना अटक करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

 read also :  https://ajinkyabharat.com/accused-of-committing-murderous-attack-on-youth-tasantach-gajaad/

Related News