हिरपूरमध्ये गुरुदेव गोरक्षनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव भक्तिभावात साजरा; भाविकांची मोठी उपस्थिती

हिरपूरमध्ये गुरुदेव गोरक्षनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव भक्तिभावात साजरा

हिरपूर (ता. अकोट) – हिरपूर गावातील थोर संत श्री गुरुदेव गोरक्षनाथ महाराज यांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव

२४ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

माळीपुरा येथील गोरक्षनाथ मंदिरात संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाची सुरुवात २४ जुलै रोजी कळसस्थापनाहरिनाम सप्ताहाच्या उद्घाटनाने झाली.

यानंतर ह.भ.प. बाळकृष्ण मेटांगे महाराज यांच्या हस्ते तुकाराम चरित्र ग्रंथकथा सुरू झाली.

दररोज सकाळ-सायं आरती, दुपारी कथा वाचन, रात्री भजन-कीर्तन असे कार्यक्रम नियोजनबद्ध पार पडले.

प्रमुख आकर्षण ठरलेले कार्यक्रम:

  • २४ जुलै – श्री गुरुदेव भजन मंडळ, अमतवाडा

  • २७ जुलै – श्री शिवानंद दादाजी महिला मंडळ, हिरपूर

  • २९ जुलै – श्री मरी माता महिला मंडळ, हिरपूर

  • ३० जुलै – श्री वसंत बाबाजी गवळी (दर्यापूर) यांचे प्रवचन

  • ३१ जुलै – श्री जयाजी महाराज हरिपाठ मंडळाच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप

३१ जुलै रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद देण्यात आला, ज्यामध्ये मोठ्या संख्येने गावकरी व भक्तांनी सहभाग घेतला.

या महोत्सवाचे संपूर्ण आयोजन सनातन सतधारणा सेवा मंडळ, गोरक्षनाथ मंदिर समिती, आणि हिरपूर ग्रामस्थांनी संयुक्तरित्या पार पाडले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर सर्व आयोजकांनी भाविकांचे आभार मानले आणि गुरुदेवांच्या कृपेसाठी प्रार्थना केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/karanja-shaharat-vinaparwana-shakari-autoncha-vikha-vikha-vahtuk-shakhechachaya-rulakshamue-citizen-sent/