कामरगाव :- कारंजा तालुक्यातील कामरगाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्येची मोठे गाव असून
त्या गावात हिंदूस स्मशानभूमी मधील 2 मोठया बाभळीच्या झाडाची अवैध रित्या वृक्षतोड झाल्याची माहिती
कामरगावचे सरपंच यांनी शासनाच्या 112 हेल्पलाइन दिली.
त्यानंतर कामरगाव पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी यांनी अवैध वृक्षतोड
झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली.
असता अवैध वृक्षतोड करून कटाई केलेले लाकडाच्या मोठ्या पेऱ्या घटनास्थळावरून
चार चाकी वाहनाच्या साह्याने लंपास केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा कामरगाव परिसरात वृक्षतोड करणाऱ्या गुंडकृतीच्या टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकात केली जात आहे.
मात्र दुसरीकडे वनविभागाचे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना वर कारवाईसाठी दिरंगाई दिसत असल्याची ग्रामस्थात चर्चा रंगताना दिसत आहे.
त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेऊन अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची चोरी
करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कामरगाव येथील ग्राम.प सदस्य व सरपंच यांनी केली आहे.