अकोल्याच्या हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ता जितेंद्र आव्हाड
यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्देशन देण्यात आले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून भगवा दहशतवाद
या शब्दप्रयोगाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा
यावेळी तीव्र शब्दात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
या दरम्यान हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आंदोलनात उपस्थिती होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/karanja-city-mokat-kutryanchaya-dahshatikhali/