हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका

हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका

अकोला प्रतिनिधी | २ जुलै २०२५

हिंदी सक्तीबाबत मनसे व शिवसेनेच्या भूमिकांवरून राज्यातील राजकारण तापले असताना,

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Related News

“हिंदी पहिल्या ते बारावीपर्यंत सक्तीची करावी, असा मसनेकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मंजूर केला होता.

त्याच अहवालावर त्यांच्या स्वाक्षरी आहे,” असे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे सध्याचे आंदोलन म्हणजे

“मराठी माणसाची सहानुभूती मिळवण्याचा केवळ राजकीय प्रयत्न” असल्याचे ते म्हणाले.

“राज ठाकरे यांनी आंदोलन सुरू केल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यात उडी घेतली,” असा खोचक आरोप करत त्यांनी दोघांवर अप्रत्यक्ष टोला हाणला.

अकोला दौऱ्यात माध्यमांशी बोलताना जाधव यांनी पुढे सांगितले की, ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र येतील की नाही हे त्यांचेच ठरवायचे आहे.

मात्र, महायुती ही आगामी निवडणुकीत निश्चितच विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय त्यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ महामार्गासाठीही शेतकरी आपली जमीन देतील,

आणि सरकारही सकारात्मक भूमिका घेईल, असे मत व्यक्त केले.

Read Also :  https://ajinkyabharat.com/mahamargawar-fierce-disguise/

Related News