विरार | प्रतिनिधी
मुंबई उपनगरातील विरारमध्ये बुधवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला.
२१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने केवळ ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Related News
निवासी वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा आरोप….
🇮🇳 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट; पाकिस्तानात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत चर्चेला उधाण
मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या
अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिला जीव
कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो….
उष्णतेचा चटका!
पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट
श्रीनगरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा नागरिकांना परत
पहलगाम हल्ल्याचा मोठा परिणाम:
“आता बस्स! आतंकवाद संपवाच – मुर्तीजापुरातून संतप्त आवाज”
मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?”
पळसो बढेतील कासमपुरात चोरट्यांचा प्रवेश;
ही घटना विरार पश्चिमेकडील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीमध्ये घडली.
७ वर्षांनी झालेलं अपत्य… पण काळाने हिरावून नेलं
विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य २१ व्या मजल्यावर राहत होते. ७ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात बाळाचं आगमन झालं होतं.
त्यांनी आपल्या चिमुकल्याचं नाव ‘व्रिशांक उर्फ वेद’ असं ठेवलं होतं.
घटनेच्या दिवशी बाळ झोपत नव्हतं म्हणून पूजा त्याला कुशीत घेऊन घरात फिरत होत्या.
त्या मास्टर बेडरूममध्ये होत्या आणि हवेसाठी त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली होती.
दुर्दैवाने, फरशीवर पाय घसरला आणि त्या झटक्यात बाळ तिच्या कुशीतून सुटून थेट बाल्कनीतून खाली पडला.
तत्काळ रुग्णालयात नेले… पण
घटनेनंतर तातडीने बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
ही घटना सेदानी कुटुंबासाठी शोकांतिकेची बनली असून, संपूर्ण सोसायटी शोकमग्न झाली आहे.
पालकांनी घ्यावी खबरदारी
स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, ही दुर्घटना अपघाती असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.
मात्र, ही घटना उंच इमारतींमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.
खिडक्यांना ग्रील, बाल्कनीत अडथळे, आणि बालकांची काळजी घेण्यासाठी अधिक सावधगिरी बाळगणं —
या गोष्टींना हलगर्जीपणा केल्यास आयुष्यभराची वेदना पदरी येऊ शकते.
Read Also : https://ajinkyabharat.com/kasaiche-signs-india-7-days-pakistanwar-motha-war-karu/