गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला, पुरुष, बालकांची तपासणी अकोट तालुक्यातील पुंडा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोग्य शिबिर व योगा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये गावकरी, वयोवृद्ध महिला व पुरुष यांची आरोग्य तपासणी तसेच योगाभ्यास घेण्यात आला. “सशक्त नारी – सशक्त परिवार” या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह, एड्स, सिकल सेल, वजन, उंची, गरोदर माता तपासणी तसेच बालकांचे लसीकरण करण्यात आले. किशोरवयीन मुलींसाठी आहार व स्वच्छता विषयक मार्गदर्शन सभा घेण्यात आली. या शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी कैसर बेग, आरोग्यसेविका कु. शुभांगी बारब्दे, गिरी, चौबे, आरोग्यसेवक सुनिल मोहोळ, वैभव मोहोळ, गट प्रवर्तक वर्षाताई, आशास्वयंसेविका अर्चना वानखडे, नलिनी पुंडकर, सविता सूर्यवंशी, जयश्री गव्हाळे, करुणा आग्रे, सरला आग्रे यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाला सरपंच सौ. लता शाम वाकोडे, उपसरपंच सुधाकर दादाराव पुंडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या परिश्रमांमुळे आरोग्य व योगा शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
read also:https://ajinkyabharat.com/cable-carcut/