एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे प्रमुख होतील अशी राजकारणात चर्चा रंगली आहे,
त्यावर राजू पाटील यांनी आपलं मत मांडलं. “उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती ते असं करणार नाही
हा सर्व राजकारणाचा भाग आहे. मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील”
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
“गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले.
मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?.
आमच्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त घोषणा झाल्या. यांना गडचिरोली, रायगड,
पालघर या ठिकाणी पालकमंत्री पदाची गरज सेवा करण्यासाठी की मेवा खाण्यासाठी?.
हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांना माहित आहे” अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे माजी मनसे
आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “पेरलेलं कधी कधी उगवतं.
मात्र उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती. ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग” असं राजू पाटील म्हणाले.
ठाण्याच पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली
असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
हे पद सेवेसाठी नाहीतर मेवा खाण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. “आमची सर्वांची अपेक्षा होती
की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे, आणि ते असते तर आगरी समाजाला
ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती. त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद
आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही
तर पालकमंत्री असताना काय होणारे?” अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
“थोड्या आमच्या अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत. जसं धरण फक्त घोषणा झाली.
मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही
त्या रागापोटी हे ट्विट केले आहे” असं राजू पाटील म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/jain-monks-sermon-at-vatsalyadham-old-age-home-dalambi/