हातकणंगलेत धक्कादायक प्रकार! 11 वर्षीय मुलाची विजेचा शॉक देऊन हत्या, 14 वर्षीय आरोपी ताब्यात

हातकणंगलेत धक्कादायक प्रकार! 11 वर्षीय मुलाची विजेचा शॉक देऊन हत्या, 14 वर्षीय आरोपी ताब्यात

हातकणंगले | १७ जून

हातकणंगले तालुक्यातील निजामीया मदरशामध्ये 11 वर्षीय फैजान नाजिम या मुलाची विजेचा शॉक देऊन

हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Related News

14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरशातून बाहेर पडण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

रविवारी रात्री घडलेली ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली.

फैजानच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमा संशयास्पद वाटल्याने फॉरेन्सिक तपास करण्यात आला.

तपासात फैजानला शॉक देऊन ठार मारल्याचे स्पष्ट झाले.

ब्लेड, वायरचा वापर करून नियोजनबद्ध खून

फॉरेन्सिक तपासात आरोपीने ब्लेड, वायरसारख्या वस्तू वापरून फैजानला शॉक देण्याची व्यवस्था केली होती.

शॉक देत असताना त्याने फैजानचे तोंड बंद केले होते, जेणेकरून तो ओरडू नये.

या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/ai-aircraft-is-an-uproar/

Related News