हरियाणा विधानसभेच्या 90 जागांवर मतमोजणी सुरू, भाजप आघाडीवर

काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता

मुंबई : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. निकालात सुरुवातीला काँग्रेसने (congress)प्रचंड आघाडी घेतली होती.

 

मात्र आता निकाल बदलत असल्याचे पाहायला मिळत असून भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा जल्लोष करणाऱ्या काँग्रेसची आता वक्त बदल गए और जज्बात बदल गए, अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

Related News

मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली.

कालांतराने काँग्रेसची आघाडी मजबूत होत गेली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले. फोटो आणि सेल्फी काढण्यात आले.

काँग्रेस कार्यकर्त्यांना हरियाणात विजयाची इतकी आशा होती की ते ढोल-ताशांच्या तालावर ही नाचले.

तर जिलेबीसह लाडू वाटपदेखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.पण हरियाणा निवडणुकीचे ट्रेंड झपाट्याने बदलले.

भाजप आणि काँग्रेसमध्ये हरियाणात (Hariyana) चुरशीची लढत झाली.

मात् आता भाजपने हरियाणामध्ये बहुमत मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता पाहायला मिळत आहे.

Related News