भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसंच
हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या.
त्यानुसार, जम्मू- काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा
Related News
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; "सरकारने मराठ्यांविरोधात नियोजित कट रचला", 2029 संदर्भातही दिला मोठा इशारा
सरकारवर गंभीर आरोप; मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा
मराठा आरक...
Continue reading
UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली मोठी अपडेट; 2,000 रुपयांवरील व्यवहारांबाबत नेमकं काय?
UPI व्यवहारांवर MDR लागू होणार? नव्या विधेयकामुळे निर्मा...
Continue reading
48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट? अमेरिका-इस्रायलवर राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप; मध्यपूर्वेत पुन्हा वाढला तणाव
मसूद पेजेशकियन यांचा खळबळजनक दावा; अमेरिका आणि इस्रायलचा 48 तासा...
Continue reading
महायुतीत पुन्हा धुसफूस? 'लाडकी बहीण' योजनेमुळेच भाजप सत्तेत; रविंद्र धंगेकरांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण
शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा; 'लाडकी बहीण' योजनेचं...
Continue reading
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळ आल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे
Continue reading
CJP ची आज मोठी घोषणा! सात तासांची बैठक, हजारो सूचनांचा अभ्यास; देशव्यापी विस्ताराचा रोडमॅप जाहीर होणार
नीट पेपरफुटी प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत द...
Continue reading
तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर हरयाणात एकाच टप्प्यात १ ऑक्टोबरला
निवडणूक होणार आहे. तर दोन्ही निवडणुकांचे निकाल ४ ऑक्टोबर रोजी
जाहीर होतील. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
यांनी ही घोषणा केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर
आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “आम्ही अलीकडेच
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा
आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी लोकांमध्ये निवडणुकांसाठी मोठा उत्साह दिसून आला.
त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे. लोकांना निवडणुका व्हाव्यात
अशी इच्छा आहे. तिथं शक्य तितक्या लवकर निवडणुका आयोजित करु
असं आश्वासन आम्ही दिलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जम्मू- काश्मीरमधील
मतदान केंद्रावर लागलेल्या लांबलचक रांगा हा पुरावा आहे की,
लोकांना केवळ बदलच नव्हे तर त्या बदलाचा एक भाग बनून आवाजही उठवायचा आहे.
महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/70th-national-film-awards-announced-today/